लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कळमनुरी ते इसापूर धरण रस्त्यावरील खड्डे बुजवावे, या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर १३ सप्टेंबर रोजी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.कळमनुरी ते इसापूर धरण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून ४ ते ५ गावांचे नागरिक ये-जा करतात. येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना येथील रस्ता नकोसा वाटत आहे. रस्ता दुरूस्तीसाठी सा.बां. विभागाला निवेदनही देण्यात आले होते. परंतु रस्त्याची डागडुजी झाली नाही. त्यामुळे ३-४ गावातील ग्रामस्थांनी एक दिवस धरणे आंदोलन करत खड्डे बुजविण्याची मागणी केली. निवेदन उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी देण्यात आले. धरणे आंदोलनात सुनील पाईकराव, बबन बर्गे, नवाब पठाण, सलमान खान, पिंटू डोंगरे, दिलीप डोंगरे, प्रकाश कवाने, किरण पाईकराव, राजू पाटील, दर्शन ढोले, भगवान बलखंडे आदींचा समावेश होता.
खड्डे बुजविण्यासाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:56 PM