शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे

By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 07, 2023 6:40 PM

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला.

- सतीश घनमोडेपुसेगाव (जि. हिंगोली): जिद्द, मेहनत, शिक्षण या बळावर मी पुढे चालून मोठा माणूस होऊन दाखविन, हे स्वप्न सागरने उराशी बाळगले होते. रात्रंदिवस अभ्यास करून सागरने पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार करून आई- वडिलांचीही इच्छा पूर्ण केली. मुलगा पीएसआय झाल्याचे पाहून आई- वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील सागर शंकरराव कापसे याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. सागरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पुसेगाव येथे झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण श्री संगमेश्वर ज्ञानमंदिर जयपूर, बारावीचे भारत माध्यमिक शाळा रिसोड तर पदवीधरचे शिक्षण इंद्रा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णूपुरी नांदेड येथून झाले.

पदवीला असतानाच त्यांनी ठरवले होते की, आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला. गत पाच वर्षांपासून सागर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अगदी थोड्या गुणांनी त्याची निवड राहिली. मात्र, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ‘एमपीएससी’ परीक्षेत त्याने ४६ वा रँक मिळविला. त्यामुळे त्याची ‘पीएसआय’ साठी निवड झाली. सागरचे वडील हे शिक्षक असून आई गृहिणी आहे. ध्येय व जिद्दीला खंबीरपणे पाठबळ देणारे आई- वडील आहेत. त्यामुळे मी यश पदरात पाडू शकलो, असे सागरने सांगितले.

आई- वडिलांच्या प्रेमामुळे सर्वकाही...महागाईने कळस गाठला आहे. बाहेर शिक्षण घेणे म्हणजे आज फार कठीण आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. अशा परिस्थितीत मी ‘एमपीएससी’ परीक्षा दिली. आई-वडिलांनी शेतात काम केले. तसेच वडील शिक्षक असल्यामुळे मला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही मिळाले. सागर ‘एमपीएससी’ परीक्षा पास झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने गावातून वाजत- गाजत मिरवणूक काढली. तसेच गावातील पुसेगाव अर्बन बँक, जिल्हा परिषद शाळा, बालाजी गल्ली आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी नर्सी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, माजी सैनिक कौतिकराव कापसे, सरपंच कमलबाई अंभोरे, गजानन पोहकर, गजानन खंदारे, पिंटू गुजर, सतीश सोमाणी, विवेक कान्हेड, डॉ. रामदास पाटील, मुख्याध्यापक राजोद्दीन शेख, रविकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाHingoliहिंगोली