गत काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. २२ जून रोजी जिजामातानगर, शिवाजीनगर, जवळा-पळशी रोड, नेहरूनगर, तिरुपतीनगर, नवा मोंढा आणि अकोला बायपास आदी भागामध्ये अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम राबविण्यात आली. वीज बिल वसुलीची मोहीम ही ३० जूनपर्यंत चालणार असून, वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी त्वरित महावितरणकडे जमा करावी, असे आवाहनही अधीक्षक अभियंता जाधव यांनी केले आहे.
... तर वीज केल्या जाणार खंडित
महिनाभर वीज वापरूनही काही ग्राहक वीज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे महावितरणची थकबाकी वाढत आहे. यापुढे वीज ग्राहकांनी वीज वापरून थकबाकी न भरल्यास काही कारण न देता त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित केला जाईल.
-दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता, हिंगोली शहर
फोटो १६