जिल्ह्यात १ लाख ४५ हजार १६७ घरगुती, ७५ हजार ६३४ कृषीचे तर २ हजार ६५ हे औद्योगिक ग्राहक आहेत. जिल्ह्यात वीज रीडिंग घेण्याचे आणि बिले वाटप करण्याचे काम एजन्सीला दिले आहे. एजन्सीचे कर्मचारी मीटरवरील रीडिंग घेऊन बिले वेळेवर देत नसतील तर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाते. तेव्हा ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बिले वाटप करतात एजन्सीचे कर्मचारी...
महावितरणचे कर्मचारी बिले वसुलीसाठी आहेत. वीजबिले वाटप करणारी व रीडिंग घेणारे कर्मचारी हे एजन्सीने नेमलेले असतात. त्यामुळे बिले वाटप होण्यास उशीर होतो. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना वेळेचे काही बंधन नसते. यामुळे वीजग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो, असे वीज ग्राहकांनी सांगितले.
बिले वेळेवर पोहोचतात
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एजन्सीमार्फत बिले जातात. एजन्सीचे सर्व कर्मचारी वेळेवर घरोघरी बिले नेऊन देतात. विशेष म्हणजे रीडिंगही वेळेवर घेतात. एजन्सीचे कर्मचारी वीज ग्राहकांना वेळेवर बिले देत नसतील व रीडिंगबरोबर घेत नसतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाते.
-सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता