लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांत होत असलेल्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनाही आहेत. सेनगाव येथे जि. प. लघुसिंचन विभाग ६, सिंचन व्यवस्थापन २ अशी ८ कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच कळमनुरी सिंचन व्यवस्थापन उप विभाग २, व जि. प. लघुसिंचन ४ अशी ६ कामे तर हिंगोली तालुक्यात पशुपैदास विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापन विभागाकडून २ अशी एकुण ३ कामे चालु आहेत. औंढा तालुक्यात जि. प. लघुसिंचन विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापकाकडून १ अशी एकुण २ एकूण २० कामे हाती घेतली आहेत.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. हिंगोली तालुक्यात ३ कामे सुरू असून लोकसहभागातून २७ मार्च पर्यंत ९ हजार ३९४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कळमनुरीत दोन कामे सुरू असून २१ हजार ६३० घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच सेनगावात दोन कामे असून ९७ हजार ७९७ घनमीटर गाळ तर औंढा नागनाथ येथे दोन कामे असून २ हजार २०५ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. गाळामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होत आहे. शिवाय अभियानाला लोकसहभागाचे बळ मिळत आहे.
लोकसहभागातून काढला गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:37 AM