शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका अहोरात्र कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:04 AM

नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळविण्यासाठी पदाधिकाºयांचीही साथ लाभत असल्याने प्रशासनही अंग झटकून कामाला लागले आहे. रात्रंदिवस या उपक्रमासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवसा स्वच्छता अन् रात्री अहवाल बनविण्याची कामे जोरात सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळविण्यासाठी पदाधिकाºयांचीही साथ लाभत असल्याने प्रशासनही अंग झटकून कामाला लागले आहे. रात्रंदिवस या उपक्रमासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवसा स्वच्छता अन् रात्री अहवाल बनविण्याची कामे जोरात सुरू आहेत.हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळावे, यासाठी लोकसहभागाच्या केलेल्या प्रयत्नांना बºयापैकी यश आले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात मुख्य रस्ते, पारंपरिक कचरा टाकण्याची औंढा रोड, महादेव वाडी, रिसाला बाजारचे कॉर्नर आदी ठिकाणे आता साफ दिसू लागले. शहरातील सर्व भागात घंटागाड्या फिरू लागल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगळा करून टाकण्याची सवय रुजत चालली आहे. एवढे करूनही कुठे कचरा न उचलल्यास नगरपालिकेच्या अ‍ॅपवर तक्रारी केल्या जात आहेत. त्याला वेळेत प्रतिसाद दिला जात आहे. जनतेचा या स्वच्छतेच्या जागरात सहभाग वाढू लागला आहे. मकरसंक्रांतीला अनेकांनी डस्टबिनचे वाणात वाटप केले. अनेक स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा वैयक्तिक सहभागही विविध ठिकाणी घेतलेल्या श्रमदानाच्या मोहिमेनंतर वाढला आहे. काहींनी सीएसआरचा निधीही दिला. यात बँक आॅफ इंडियाने तीन लाखांचे सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन व २ हजार डस्टबिन, एचडीएफसी बँकेने सव्वा दोन लाखांच्या कचरा कुंड्या व पाच हजार कापडी पिशव्या, देना बँकेने ३0 हजारांचे सार्वजनिक ठिकाणी बसायचे बेंच, यश डेव्हलपर्स व खालेदभाई यांनी ८0 कचरा कुंड्या, एमडी फॅन्स ग्रुपने २.४0 लाखांच्या ३ हजार डस्टबिनचे वाटप केले. यात ओला व सुका कचºयाच्या समान डस्टबिनची संख्या आहे. अकबर फॅब्रिकेशनने स्वच्छतेचा लोगो असलेला चष्मा दिला आहे. आता कामाच्या तपासणीसाठी पथक येणार असल्याने रात्रंदिवस कर्मचारी काम करीत आहेत. सीओ रामदास पाटील हेही तळ ठोकून बसत आहेत.