शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

खून प्रकरणात दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 AM

वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.वसमतमधील मोंढा भागातील बहिर्जी विद्यालयाजवळ असलेल्या पानटपरीवर पानटपरीचालक व राजू चांदू तिकासे (२८) यांच्यात वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली. हाणामारीत राजू तिकासे हा जागीच ठार झाला होता. शनिवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी मयताची आई पारूबाई चांदू तिकासे यांनी पोलिसात तक्रार दिली. यात तिच्या मुलाला आरोपी मारहाण करत होते. याची माहिती मिळाल्याने आई भांडण सोडवण्यास गेली असता आरोपीने जमिनीवर ढकलून दिले व मुलास बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा मरण पावल्याचे नमूद केले आहे.या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी खादर व नसीर (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर.आर. धुन्ने करत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात भांडणाचे कारण स्पष्ट होणार आहे. मयत राजू तिकासे हा त्याच्या पत्नीसह भोकर येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षानंतर तो वसमतला आईला भेटण्यास आला होता. राखी पोर्णिमेसाठी तो रविवारी बहिणीकडे डोंगरकड्याला जाणार होता. मात्र शनिवारी रात्रीच ही घटना घडली. त्याच्या कुटूंबियांचा शोक हृदय हेलावून टाकणारा होता.न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा