लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील बारा ज्योतिलिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिरामध्ये विजयादशमीनिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा गुरुवारी रात्री ७ वाजता काढण्यात आली.‘श्रीं’चा चांदीचा मुखवटा हा पालखीमध्ये ठेवून ‘श्रीं’ सीमोल्लंघनाला जाऊन त्यांचे मामा असलेले लंवडेश्वर मंदिरात दर्शन घेण्यात आले. ‘श्रीं’ची पालखी ही शहरातील नागनाथ मंदिरांमधून बालाजीनगर, संत सावता मंदिर, स्व.मीनाताई ठाकरे चौक, सोनार गल्ली, शिवाजीनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कासार गल्ली, रहीम चौक, लोकमान्य टिळक असा मार्गक्रम करत परत नागनाथ मंदिरामध्ये आली.पालखीसोबत सहसचिव विद्याताई पवार, विश्वस्त गजानन वाखरकर, विश्वस्त गणेश देशमुख, देविदास कदम. मुजाभाऊ मगर, रमेशचंद्र बगडिया, आनंद निलावार, शिवाजी देशपांडे, सह व्यवस्थापक शंकर काळे, व्यवस्थापक वैजनाथ पवार उपस्थित होते. पालखीमध्ये पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने आले होते. पालखी मिरवणुकीत नागेश्वर शाळेच्या वतीने ढोलताशा लावण्यात आल्याने पालखीला शोभा आली. नगरपंचायतच्या वतीने विजयादशमी निमित्ताने नगराध्यक्ष सविता चोंढेकर, उपाध्यक्ष मोतीराम राठोड, मुख्यधिकारी निशिकांत प्रचंडराव आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
औंढ्यात नागनाथाची पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:55 PM