आजच्या धावपळीच्या जीवनात कधी काय होईल हे निश्चित सांगता येत नाही. यामुळे आपण नसल्यानंतरही आपले कुटुंब व वारसांना अडचणीत न साेडता डाक जीवन विम्यातून ‘जीवन संरक्षण’ घेत भविष्यासाठी गुंतवणूक करावी. याचप्रमाणे हिंगाेली येथील शिक्षिका वर्षा नाईक यांनी डाक जीवनमधून विमा उतरविला. त्यांचे निधन झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली. यानंतर काही दिवसांत डाक कार्यालयातून या प्रकरणी रीतसर प्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या वारसदारांना जीवन विम्यापाेटी १९ लाख ४२ हजार ४५६ रुपयांचा विमा लाभ देण्यात आला. २३ जुलै राेजी कैलास नाईक यांना डाक अधीक्षक एस. एम. अली, साहाय्यक डाक अधीक्षक खदीर, पोस्टमास्टर रमेश बगाटे, विनायक मुंढे, भागवत गायकवाड यांच्यासह पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.
फाेटाे नं. १०