या चर्चासत्रासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेंन, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, मंदाताई पवार यांची उपस्थिती हाेती. वेबिनारमध्ये प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, डॉ. श्याम साळुंखे, प्राचार्य डॉ. बी. जी. गायकवाड, उपप्राचार्य डॉ बी. एस. क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सचिन अग्रवाल यांनी केली.
वेबिनारसाठी प्राध्यापक दीक्षित इंगोले यांनी तांत्रिक सहाय्यकाचे कार्य केले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये ९०० अधिक प्रतिनिधीनी सहभाग नोंदविला. या नोंदणीमध्ये विविध देशातील पंधराहून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तमराव जाधव, विजय पवार, डॉ. संदीप लोंढे, डॉ. गुणाजी नलगे, डॉ. श्रीराम कऱ्हाळे, डॉ. किशोर इंगोले, डॉ सुखनंदन ढाले, डॉ. निवृत्ती हुरगूळे, डॉ. सुधीर वाघ, डॉ. इक्बाल जावद, डॉ. आर. बी. भाकरे, प्रा. बाप्पा जाधव, प्रा. सुनील कांबळे आदींची उपस्थिती हाेती.