जवळा पांचाळ हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून ग्रामपंचायत ११ सदस्यीय आहे. यावर्षी ग्रामपंचायतीसाठी सहा महिला व पाच पुरुष उमेदवारांना संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रत्येकजण प्रतिष्ठा पणाला लावत आहे. अर्ज छाननीनंतर ४ जानेवारी रोजी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता उरलेल्या २२ उमेदवारांत दोन पॅनलमध्ये रंगतदार दुहेरी लढत पहायला मिळत आहे. बैठकांचे सत्र सुरू आहे. दुसऱ्या पॅनलपेक्षा आपला पॅनल कसा मजबूत बनेल, यासाठी पॅनलप्रमुख रणनीती आखत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन चेहरे पहायला मिळत आहेत. यावर्षी जवळा पांचाळ येथे ३ हजार ६०० मतदार व चार प्रभाग आहेत. गेल्या पाच वर्षांचा आराखडा लक्षात घेता मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करणार असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत मातब्बर पुढाऱ्यांसमोर तरुंणाचे आव्हान आहे. एकंदर निवडणूक चुरशीची होणार आहे. यंदा मतदार कोणाला कौल देणार याचा निर्णय निकालावर अवलंबून आहे.