अँटिजन चाचणीत हिंगोलीत २०७, सेनगाव २७, औंढा ९०, वसमत १३१ अशी एकूण ४५५ जणांची तपासणी केली असता एकही बाधित आढळला नाही. तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत १७ पैकी पारडी येथील एक वृद्धा बाधित आढळली. तर औंढा ६७, वसमत २२, कळमनुरी ३४, सेनगाव २० जणांची आरटीपीसीआर चाचणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. आज बरे झालेल्या चार जणांना नवीन कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोना बाधित पारडी येथील वृद्ध महिलेचा आज मृत्यू झाला.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण १६ हजार २२ रुग्ण आढळले. तर १५ हजार ६२६ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाने ३९२ जण दगावले आहेत. सध्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.