लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवदुर्गोत्सवासाठी मंडळांनी आॅनलाईन परवानगी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यात नवदुर्गोत्सव दरवर्षी मोठ्या थाटात साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्याकरीता पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. यापूर्वी सदर परवानगी ही लेखी स्वरूपाचा अर्ज सादर करून घेता येत होती. परंतु केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत क्राईम अँण्ड क्रिमीनल ट्रेकिंग अँण्ड सिस्टीम संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्यामुळे २०१९ यावर्षीपासून आता नवदुर्गाेत्सव साजरा करण्यासाठी मंळडांना संबधित पोलीस ठाण्यात आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. यामध्ये मंडळासंबधी माहिती, विसर्जनाचा मार्ग, स्थापनेची जागा व दिनांक इत्यादीची सविस्तर माहिती आॅनलाईन अर्जात भरावी लागणार आहे. तसेच त्यावर पोलीस ठाण्याकडून पडताळणी करून मंडळाला परवानगी देण्यात येईल. कोणीही लेखी स्वरूपात परवानगीकरिता अर्ज करू नयेत. आॅनलाईन पद्धतीने परवानगीकरिता भरावयाचा अर्जाचा नमुना ६६६.ेँस्रङ्म’्रूी.ेंँं१ं२३ँ१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच या संकेतस्थळाचा वापर करून युजर आयडी तयार करून अर्ज करता येऊ शकतो. त्यामुळे मंडळांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आॅनलाईन अर्ज करताना काही अडचणी आल्यास संबंधित पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
नवदुर्गोत्सवासाठी आॅनलाईन परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:48 PM