- राहुल टकले
हिंगोली : विविध स्वरुपाची कर आकारणी निश्चित करुन १ आॅगस्ट पासूनही कर आकारणी महसूल विभागाच्या वतीने लागू केली जाते. एक प्रकारे महसूल विभागाची नवीन खातेवहीच या दिवसांपासून सुरु केली जाते. तसेच या विभागातंर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याच दिवशी यथोचित गौरवही केला जातो. या अनुषंगाने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह पाचही तालुक्यात महसूल दिन साजरा करण्यात आला.
१९३० मध्ये धारवाड येथे वॅटसन अॅडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने जमिनीच्या शेती विषयी अथवा शेतसाऱ्या विषयी माहिती देण्याविषयीची पद्ध तालू गेली. पुढे ती अॅडसन मॅनिअल या नावाने प्रचलित झाली. तेव्हापासून देशभरात शेतसाऱ्याचा कर शेतकऱ्यांना आकारल्या जातो व त्याची वसूली या विभागाकडून केली जाते. स्वतंत्रपूर्व काळात जमाबंदी न्यायिक व महसूली ही कामे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे होती. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यांची निर्मिती झाल्यानंतर शासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्विकारली. त्यामुळे महसूल विभागाकडे विविध कामांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. आंज घडीला या विभागाकडून विविध प्रकारची १३२ कामे पार पाडली जातात. १९३० पासून सुरु असलेली ही पद्धत गेल्या ८९ वर्षांपासून अखंडितपणे सुरु आहे.
३१ अॅगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना शेतसाऱ्यासह विविध प्रकारचे कर लागू करण्यासंदर्भतील निश्चिती केली जाते. त्यानंतर १ आॅगस्टपासून ही महसूल जमिन वसूली मागणी निश्चित केल्यानंतर जमा बंदी लागू केली जाते. एक प्रकारे महसूल विभागाच्या कामांना १ आॅगस्टपासून सुरुवात होते. या दिवसांपासूनच तलाठ्यांपासून या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण जमिन महसूलाच्या अधिकृतरित्या कामाला सुरुवात करतात. १ ते २१ गाव नमुने, सातबारा आदींची माहिती अद्यावत केली जाते.
हिंगोली जिल्ह्यात तीन उपविभाग२०१३ पर्यंत जिल्ह्याला हिंगोली व वसमत हे दोन महसूली उपविभाग होते. परंतु २०१३ साली राज्य शासनाने कळमनुरी या उपविभागाची स्थापना केली. हिंगोली उपविभागात हिंगोली व सेनगाव हे दोन तालुके येतात. यामध्ये एकूण २६२ गावे, १३ मंडळ व ७६ तलाठी सज्जे येतात. वसमत उपविभागात वसमत व औंढा नागनाथ हे दोन तालुके येतात. त्यामध्ये एकूण २७२ गावे, १३ मंडळ व ६३ तलाठी सज्जे येतात. कळमनुरी उपविभागात कळमनुरी हा एकच तालुका येतो. यामध्ये १५२ गावे, १२५ ग्रामपंचायती व ३६ तलाठी सज्जांचा समावेश आहे.
जिल्ह्यात महसूल वसूलीचे उत्कृष्ट काम१९३० साली धारवाड येथे वॅटसन अॅडरसन नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली. १ आॅगस्टपासून महसूल विभागाकडून जमा बंदी सुरु. गतवर्षी हिंगोली जिल्ह्याला महसूली वसुलीचे २६ कोटी ६२ लाख १५ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने ३० कोटी ६ लाख १८ हजार रुपयांचा महसूल वसूल केला आहे. जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण करुन ३४४ कोटींचा अधिकचा महसूल यंदा वसूल केला आहे. गतवर्षी शेती महसूलाचे जिल्ह्याला ५ कोटी ६१ लाख १७ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्याने ५ कोटी ६४ लाख ९८ हजार महसूल वसूल केला. इतर महसूलाचे उद्दिष्ट २१ कोटींची दिले होते. जिल्ह्याने २४ कोटी ४१ लाख २० हजारांची वसूली केली. महसूल विभागाकडून सध्या १३२ विभागाची कामे पार पाडली जातात. जिल्ह्यात महसूल वसुलीचे उत्कृष्ट काम.
अधिकाऱ्यांचा गौरवकाही वर्षांपासून शासनाच्या वित्तीय संसाधनावर ताण पडल्यामुळे महसूली वसुलीवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास अशा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासनाकडून गौरव केला जातो. यावर्षी १ आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.