लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत तालुक्यातील वाई त. धामणगाव ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांची बनावट देयके सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीची चौकशी झाली. त्यात अनियमितता आढळल्याने नोटीसही बजावली. मात्र कारवाई झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.या गावातील कामांबाबत आॅक्टोबर २०१७ पासून तक्रारी सुरू आहेत. तर विस्तार अधिकाºयामार्फत या गावात चौकशीही झाली. विस्तार अधिकाºयांनी त्याचा अहवालही वसमत पंचायत समितीला सादर केला होता. वसमत पंचायत समितीने हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविला होता. याबाबत १६ डिसेंबर २०१७ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित ग्रामसेवक टी.एल.कोकरे यांना ग्रा.पं.चे सचिव या नात्याने कामात कसूर करून अनियमितता केल्याने नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता. तर याबाबत खुलासाही मागविला होता. मात्र पुढील कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. यात दिलेल्या ११ धनादेशाच्या पावत्याच दर्शविलेल्या नसल्याचे अहवालात म्हटले होते.यात किशोर एजन्सीजला तीन, शंकर नामदेव मगर यांना ५, कयाधू प्लास्टिकला दोन धनादेश दिले, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे.
चौकशी होवूनही कारवाई होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:41 AM