लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : फेब्रुवारीपासून रेशनकार्ड धारकांना ई-पॉस मशिनचा माध्यमातून धान्य वाटप बंधनकारक केले आहे; परंतु तालुक्यातील अनेक रास्त भाव दुकानदार या मशीनचा वापर न करता धान्य वाटप करीत असल्याने अशा दुकानदारांवर सेनगाव तहसील कार्यालयाने थेट निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे.रेशनिंग धान्याच्या काळा बाजार थांबावा, राशन कार्डधारकांना त्याच्या हक्काचे धान्य मिळावे, यासाठी शासनाने ई-पॉस मशिनचा माध्यमातून धान्य वाटपाचा आॅनलाईन यंत्रणा अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून सेनगाव तालुक्यातील एकूण १४८ रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप केले आहे. मशिन हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कारवाईने रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले असून ई-पॉस मशिनचा वापर न करणाऱ्या दुकानदारांची या पुढे काही खैर नाही.फेब्रुवारी पासून ई पाँस मशिनवर राशन कार्डधारकांचे थम्ब घेवून धान्य वाटप बंधनकारक केले असताना तालुक्यातील १६ रेशन दुकानदारांनी मार्चमध्ये ई-पॉस मशिनचा माध्यमातून धान्याचे वाटप केले नाही. अशा दुकानदारांविरोधात तहसीलदार वैशाली पाटील यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.तहसीलदार पाटील यांनी मार्च महिन्यात ई पॉस मशिनवर २० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वाटप करणाºया दुकानदारांविरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे परवाने निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे.पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यात ई-पॉस मशीनवर २० टक्केपेक्षा कमी धान्य वाटप करणाºया दुकानदारांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. यापुढे ई-पॉस मशीनच्या माध्यमातून १०० टक्के धान्य वाटप केले जाणार असून यात हयगय करणाºया दुकानदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
ई-पाँसचा वापर न करणे महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:19 AM