शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

वाळू मिळत नसल्याने ५४२ घरकुलांच्या कामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:52 PM

लिलावाची प्रक्रिया ठप्प असल्याने वाळूच मिळेना 

ठळक मुद्देतहसीलकडे दिलेली यादी पडूनकामे तशीच प्रलंबित राहणार

हिंगोली : वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यातच यात शासन नवनवीन सूचना काढत असल्याने आगामी काळात वाळूघाट लिलाव होतील की नाही, याची शाश्वती उरली नाही. मात्र याचा फटका घरकुल बांधकामाच्या लाभार्थ्यांना बसत असून हिंगोलीत ५४२ घरकुलांचे काम यामुळे ठप्प झाले आहे. तर दोनशेवर कामे सुरू करण्यास लाभार्थी धजावत नाहीत.

हिंगोली शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसह विशेष प्रकल्पांतर्गत १0९८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी विशेष प्रकल्पात १३९ घरकुलांना काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळालेली असल्याने याबाबतची पुढील प्रक्रिया आता कुठे गतिमान झाली आहे. मात्र ९५९ घरकुलांच्या कामांचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. यापैकी १७0 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ज्यांची जास्तीची पदरमोड करण्याची कुवत होती, अशांनी ही कामे पूर्ण केली आहेत. मात्र ज्यांना हे शक्य नाही, अशांना वाळूसाठी काम थांबवण्याची वेळ आली आहे. वाळूघाटांचे अधिकृत लिलाव झालेले नसल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय अशी वाळूही वेळेत मिळतच नसल्याचे चित्र आहे. मिळेल त्या भावात वाळू घेण्याइतपत हे लाभार्थी सक्षम नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ५४२ कामे चालू झालेली असली तरीही वाळूअभावी ठप्प आहेत. तर उर्वरित २४७ कामे लाभार्थी याच कारणाने सुरू करीत नसल्याचे चित्र आहे. या लाभार्थ्यांना इतरांचे हाल पाहून आपण काम सुरू न करण्यातच शहाणपण असल्याचे दिसत आहे. काहींचा या थंडीच्या काळात उघड्यावर संसार सुरू आहे. तर काहींना घरभाडे भरून घडाईपेक्षा मढाई जास्त या उक्तीचा प्रत्यय येत आहे. मिळणाऱ्या अनुदानापेक्षा घरभाड्यातच जास्त रक्कम जात असल्याची ओरड होत आहे. मात्र यावर काही पर्याय निघत नाही.

कामे तशीच प्रलंबित राहणारघरकुलांच्या लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाने वाळू उपलब्ध करुन द्यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यासाठी तहसीलदार व न.प.लाही पत्र दिले होते. याप्रमाणे हिंगोली न.प.ने ९५९ लाभार्थ्यांची यादीही तहसील प्रशासनाला पाठविली होती. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही नाही.काही ठिकाणी डस्टचा वापर करण्याची सूचना दिली जात असली तरीही ती सर्वच कामांसाठी वापरता येत नाही, ही अडचण लक्षात घ्यायला कुणीच तयार नाही. शिवाय त्यातही वाळू मिसळावीच लागते. लहानसे काम करणाऱ्यांना हे परवडणारे नसते. त्यामुळे या भानगडीत कोणी पडत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनानेच यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्यथा ही कामे अशीच प्रलंबित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :sandवाळूHingoliहिंगोलीHomeघर