शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
2
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
3
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
5
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
6
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
7
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
8
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
9
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
10
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
11
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
12
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
13
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
14
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
15
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
16
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
17
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
18
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
19
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
20
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार

आता पणनकडे तूर डाळ मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:27 AM

शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम वसुलीची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक म.रा.स. पणन महासंघाची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम वसुलीची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक म.रा.स. पणन महासंघाची आहे.शासनाकडून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. यासाठी लागणारी तूर डाळीचा पुरवठा आता थेट पणन महासंघतर्फे होणार आहे. सहा महिने पुरेल याप्रमाणे डाळीची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागास दिल्या आहेत. त्यानुसार तालुका स्तरावरून मागणी केली जात आहे. आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. शिक्षण विभागाकडे १७ मे रोजी वसमत तालुक्याचीच १७ हजार ९५५ क्विंटल तूर डाळीची मागणी आली. इतरांची येणे बाकी आहे. शाळा व विद्यार्थी पटसंख्येनुसार डाळीची मागणीच्या सूचना शासनाकडून आहेत.दीड वर्षांनंतर आहारात तूरडाळतूर डाळीची भाववाढ झाल्याने मागील एक ते दीड वर्षांपासून शालेय पोषण आहारातून तूर डाळ बंद केली होती. काही शाळांमध्ये पुरवठा सुरू होता. परंतु नंतर तोही बंद केला. त्यामुळे तूर डाळीऐवजी मसूर व मुगाची डाळ समाविष्ट केली. जिल्ह्यातील जि. प. च्या १0३२ शाळांतून १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.दरम्यान, रेशनवर ५५ रुपये किलोने हीच डाळ मिळत असताना पोषण आहाराला ७५ ते ८0 रुपये दर असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.तूर डाळीची आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी दराने डाळ खरेदी केली जात आहे. त्यामुळे शासनाकडून विविध योजनेअंतर्गत तुरीची खरेदी हमीभावाने करण्यात आली. राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लक्ष क्विंटल तूर डाळ खरेदी केली आहे.त्यामुळे आता शालेय पोषण आहार योजनेसाठी तूरडाळीचा पुरवठा केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागास तूरडाळीचा दर १ किलो ग्रॅम पॅकींगसाठी रक्कम ८० रूपये दराने व ५० कि.ग्रॅम पॅकिंगसाठी ७५ या प्रति कि.ग्रॅम दर असा आहे.पणन महासंघाकडून शिक्षण विभागास सहा महिन्यांसाठी लागणारी तूरडाळ मागणीच्या सूचना शासनाकडून आहेत. त्यानुसार मागणीची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी