लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर परिसरात सोमवारी रात्री १२.२५ मिनिटांनी गूढ आवाजानंतर आता तर सौम्य हादराही बसल्याने घरातील भांडे जमिनीवर खाली पडले. त्यामुळे भयभीत ग्रामस्थ लहान मुलाबाळांसह घराबाहेर पडले.रात्री गाढ झोपेत असताना अचानक हादरा बसल्याने घरावरील टीनपत्रेही हालले, असे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. या हादऱ्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी होती. या हादºयामुळे घरातील भांडे खाली पडले होते. पुन्हा-पुन्हा गुढ आवाज आणि जाणवणारे हादरे यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविण्यात आले आहे.नांदापूर तसेच हारवाडी, सोडेगाव, जामगव्हाण, पिंपळदरी, आमदरी, सोनवाडी, पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, सिरळी राजवाडी आदी परिसराध्ये सौम्य हादरे बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.वारंवार बसणारे हादरे व गूढ आवाजामुळे प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नांदापूर परिसरात गूढ आवाजानंतर आता हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:17 AM