हिंगोली : आखाडा बाळापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एकाच्या हातातून दीड लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली
शेवाळा येथील विजय सूर्यवंशी आज सकाळी बँक ऑफ महाराष्ट्र येथे कामानिमित्त आले होते. यावेळी रस्त्यावर एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या हातामधील दीड लाख रुपये असलेली बॅग पळवली. सूर्यवंशी यांनी त्यांच पाठलाग केला असता त्यांना बॅगेतील एक लाख तीन हजार रुपये परत मिळाले. मात्र चोरटे ५० हजार रुपये घेऊन पसार झाले आहेत. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून अधिक तपास सुरु आहे.