लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ४५३ बालकांना २८ जानेवारी रोजी डोस पाजण्यात आला. ग्रामीण ९२ तर शहरी ८८ एकूण ९१ टक्के लसीकरणचे काम झाले आहे.जागतिक पातळीवर पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी बालकांना डोस दिला जातो. २८ जानेवारी रोजी सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक तसेच शासकीय कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ पाजण्यात यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. शहरी व ग्रामीण भागात पोलिओ डोससाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. ५ वर्षाखालील १ लाख ३८ हजार ६२७ बालकांना तर पाच वर्षावरील १ हजार ८२६ एकूण १ लाख ४० हजार ४५३ चिमुकल्यांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. जिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोगय केंद्र, विविध शासकीय कार्यालय, बसस्थानकात बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी लसीकरणच्या कामात व्यस्त होते.लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेतले. नियोजनासाठी मोबाईल व ट्रान्झीट टीम एकूण ३ हजार ३१० कर्मचारी कर्तव्यावर होते. यावेळी आरोग्य अधिकाºयांकडून संबधित बुथवरील वेळोवेळी पाहणी केली जात होती. तसेच नियोजन केले जात होते.जिल्हाभरात १२३२ बुथची पोलिओ लसीकरणसाठी व्यवस्था करण्यात आली होती. तर नियोजनासाठी २३ सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली होती. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आदींनी विविध बुथला भेट देऊन बालकांना डोस पाजला.
दीड लाख बालकांना ‘पल्स पोलिओ’डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:52 PM