या प्रशिक्षण शिबिराकरिता निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, हिंगोली, कोषागार अधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, हिंगोली, कोषागार कार्यालयातील कर्मचारी तसेच इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये कोषागार कार्यालय, हिंगोली येथील लेखा लिपिक पूजा शिंदे व कोषागार कार्यालय परभणी येथील लेखा लिपिक शंकर दुमाने यांनी सभासद नोंदणीस विलंब, नॉन आयआरआय प्रान, निरंक जमा प्रान, नामनिर्देशन नसलेले प्रान, मोबाईल क्रमांक नसलेले प्रान, बँक तपशील नसलेले प्रान, आहरण व संवितरण अधिकारी यांचा तपशील, अंशत: रक्कम काढणे प्रलंबित प्रकरणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून बाहेर पडणे, नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात दावा, क्रमांक प्राप्त परंतु प्रत्यक्ष कार्यवाही नाही, नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात सेवानिवृत्तीनंतर प्रकरण सादर न करणे, मंजूर ऑनलाईन प्रकरणांत कागदपत्रे सादर नसलेली प्रकरणे, नियत सेवानिवृत्तीमधील विलंब झालेली प्रकरणे, नोंदणीकृत सभासद संख्या आणि वर्गणी कपात होणारे सभासद यातील फरक, वर्गणी पाठविण्यात होणारा विलंब, ट्रस्टी बँकेकडून रक्कम परत येणे, एनएसडील डॅशबोर्डवरील लॉगिन मोडूल, याबाबत प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच २०२०-२१ आयकर कपात करण्यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन कर सल्लागार अतुल कुलकर्णी यांनी केले. फाेटाे नं. २७