ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 11 - सेनगाव तालुक्यातील सिनगी नागा येथील शेतकरी संतोष नामदेव वामन (३३) यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना ११ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
संतोष नामदेव वामन हे शेतात हळद लावण्यासाठी गेले असता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाल्याने झाडाच्या आडोशाला उभे राहिले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वीज पडली. जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकºयांनी धाव घेवून त्यांना हिंगोली येथे १०८ च्या गाडीने हलविले. मात्र नर्सी नामदेव येथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. नामदेव वामन यांना एकुलता एकच मुलगा असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही वार्ता गावात पसरताच सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.