- दयाशील इंगोले
हिंगाेली : कोरोनाच्या संकटामुळे जि.प.शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु अनेकाकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत, तसेच इंटरनेटचा वारंवार हाेणारा खोडा याचाही परिणाम ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर होत आहे.
काेराेनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन धडे देण्यासाठी धडपड सुरू आहे. असे असले तरी, जिल्हयातील अनेक शाळांत ऑनलाईन शिकवणी कागदावरच आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राईल मोबाईल नाही, त्याठिकाणी शिक्षक गृहभेटी देवून अभ्यास करून घेत आहेत.
जि.प.शाळा, कळमनुरीकळमनुरी तालुक्यात जि. प. च्या एकूण १९५ शाळा आहेत, तर विद्यार्थी संख्या ३२ हजार आहे. तालुक्यात ऑनलाईन शिकवणीसाठी प्रयत्न केले जात असले तरी, अनेकांकडे ॲॅन्ड्राईड माेबाईल नाहीत. ऑनलाईन शिक्षणसाठी घेताना विविध अडचणी असल्याचे पालकांनी सांगितले.
जि.प.शाळा, औंढा ना.आऔंढा नागनाथ तालुक्यातील शाळांमध्ये आऑनलाइईन शिक्षण दिले जात असले तरी, वाडी व तांड्यावर रेंजच नसते. त्यामुळे येथील परिसरात आऑफलाइईन पद्धतीने विद्याथ्यार्ंना शिकविले जात आहे. आऔंढा तालुक्यातील माेजक्याच शाळेत आऑनलाइईन शिक्षण सुरू असून इतर भागात ही माेहीम कागदावरच आहे.
जि.प.शाळा, सेनगावसेनगाव तालुक्यातील जि. प. शाळांतंर्गत ऑनलाईन शिक्षण सुरू असून ऑफलाईन पद्धतीनेही विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. इंटरनेटची सुविधा असली तरी वारंवार गायब हाेणारी रेंज डाेकेदुखी बनली आहे. त्यामुळे शिक्षक गृहभेटीवर जास्त भर देतांना दिसत आहेत. प्रत्यक्ष अध्यापन व ऑनलाईन अध्यापन यात मोठे अंतर आहे.
जि.प.शाळा, हिंगोलीहिंगाेली तालुक्यातील जि. प. शाळेच्या शिक्षकांकडून सकाळी ९ ते १० यावेळेत विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. विशेष म्हणजे दिक्षा ॲॅपचा ऑनलाईन शिक्षण प्रणालीत वापर हाेताना दिसून येत आहे. रेंजअभावी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. शिक्षक घराेघरी भेटी देऊन विद्यार्थ्यांकडून गृहपाठ पूर्ण करून घेत आहेत.
जि.प.शाळा, वसमतवसमत परिसरातील जि. प. शाळेतंर्गतही ऑनलाईन शिक्षण प्रणालीबाबत विद्यार्थी व पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. परंतू त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दाेन्ही पद्धतीने शिकवणी सुरू आहे. शिक्षक व्हिडीओ पाठवित असले तरी, विद्यार्थ्यांना आकलन हाेत असेलच हे सांगणे मात्र कठीण आहे.
अडचणी काय?ॲॅानलाईन शिक्षण संदर्भात पालकांशी व विद्याथ्यथ साेबत संवाद साधला असता, इंटरनेटचा वारंवार हाेणारा खाेडामुळे अडथळा हाेताे, तर अनेकांकडे माेबाइईलच नसल्याचे आढळुन आले. त्यामुळे एकाच माेबाईवर तीन विद्याथ्डी धडे गिरवित आहेत.
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन व ऑफलाईन दाेन्ही पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ज्या शालेय मुलांकडे माेबाईल नाहीत, तेथे शिक्षक गृहभेटी देऊन मुलांना शिकवित आहेत. शिवाय इतरही विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकही विद्यार्थी काेराेना काळात शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहे. - संदीप सोनटक्के, शिक्षण अधिकारी शाळा : ८५०विद्यार्थी : ९४०००शिक्षक : ३७००शाळांमध्ये ऑनलाईन एज्युकेशन : 630