औंढा नागनाथ : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर भाजपच्यावतीने आज सायंकाळी पाच वाजता टाळमृदंगाच्या गजरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुले करण्याची मागणी करत राज्य सरकारचा निषेध केला.
राज्यात दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोट्यावधी भक्त-भाविकांचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळे बंद आहेत. देशामध्ये सर्वत्र मंदिर देवदर्शन सुरू करण्यात आलेली आहेत. केवळ महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही मंदिरे का बंद आहेत असा प्रश्न पुजारी, मंदिर परिसरातील फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला. धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी करत भाजपच्यावतीने टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन करून करण्यात आले.
आंदोलनात किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, शहराध्यक्ष औंढा बबन सोनुने , लोकसभा संघटक आशिष वाजपेयी, गजानन कुटे ,विलास काळे ,अँड शेषराव कदम ,गणेश पाटील ,रवि डोंगरदिवे ,अनील भांडे,सर्जेराव दिंडे,सखाराम इगळे सह भाजपाचे कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील वारकरी संप्रदाय व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी,पुजारी,फुल-हार,नारळ,अगरबत्ती विक्रेते आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी औंढा पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे,जमादार अफसर पठाण,गजानन गिरी,शेख एकबाल यांनी मंदीर परिसरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता.