लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अनेक महिन्यांपासून रखडले होते. अत्यावश्यक साहित्य उपलब्ध नसताना १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन उरकण्याचा घाट घातला जात आहे.केंद्र उभारून जवळपास १ वकाम अत्यंत निकृष्ट झाल्याने दवाखान्यात पाणी जमा होणे, साचलेले पाणी बाहेर निघण्यास वाट नसणे, पलंग, गादी आदी सुविधा उपलब्ध नाही. याची तक्रार जि.प. सदस्या रिता दळवी यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेतही केली होती. चौकशी करून नंतरच इमारत ताब्यात घेण्याचा ठराव घेतला होता; परंतु आता कोणत्याच सोयी-सुविधा व कार्यक्रमाचेकोणतेच अधिकृत नियोजन न ठरविता अचानकपणे १७ सप्टेंबर रोजी आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा डाव आखण्यात आला आहे. रविवारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुरूंद्यात भेट देवून साफसफाई व हारतुरे आणण्याचे निर्देश देत उद्घाटन होणार असल्याचे स्पष्ट केले.
उद्घाटनाची हौस भारी ! साहित्याचा पत्ताच नाही !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:17 AM