निवेदनात म्हटले की, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. जर आघाडी सराकरने इम्पेरिकल डाटा काढला असता तर ओबीसी बांधवांवर निवडणुकांतून हद्दपार होण्याची वेळच आली नसती. पण राज्यातील आघाडी सरकारला ओबीसीचे आरक्षण काढून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी डाटा दिला नाही, असा आरोपही केला.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले, ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी जाहीर न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल. शासनाने इम्पेरिकल डाटा न पुरविल्यामुळे ओबीसींचे आरक्षणच संपण्याच्या मार्गावर आहे.
निवेदनावर आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गजानन घुगे, फुलाजी शिंदे, मिलिंद जैन, पप्पू चव्हाण, प्रशांत सोनी, संतोष टेकाळे, यशोदा कोरडे, बाळासाहेब नाईक आदींची नावे आहेत.