लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयातही आता संचिकांचे वर्गीकरण सुरू झाले असून वर्षानुवर्षांपासून साचलेल्या कालबाह्य संचिकांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे.जिल्हा निर्मितीपासूनचा दस्तावेज जिल्हाधिकारी कार्यालयात जपून ठेवलेला आहे. यामुळे कार्यालयात नव्या संचिका ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे आता संचिकांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून जपून ठेवायच्या संचिका आता रेकॉर्ड रुममध्ये ठेवल्या जाणार आहेत. जिल्हा कचेरीत सर्वच विभागांमध्ये संचिकांवरील धूळ झटकताना कर्मचारी दिसत आहेत.
कालबाह्य संचिकांना बाहेरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:11 AM