हिंगोली: आता आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे. नूतनीकरणाची व्यवस्था ज्या ठिकाणावरून परदेशातला परवाना काढला आहे, अशा ठिकाणी करता येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.
हिंगोली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने २०१८-१९ मध्ये १ तर २०२०-२१ मध्ये ३ व्यक्तीने आंतरराष्ट्रीय परवाना काढला आहे. परदेशासाठी काढलेला परवाना नूतनीकरण करायचा झाल्यास परत भारतातच यावे लागणार आहे. कारण नूतनीकरण हे परदेशात करता येणार नाही. हिंगोली जिल्हा हा लहान असल्यामुळे या जिल्ह्यातून परदेशात जाणारे व्यक्ती हे कमीच आहेत. परदेशातला वाहन परवाना जास्त करून विद्यार्थी, व्यापारी तसेच पर्यटक काढत आहेत. इतर सामान्य व्यक्ती परदेशातला परवाना काढत नाही, तसेच पाहिले तर हिंगोली जिल्ह्यात पर्यटकांची संख्याही तशी कमीच आहे.
असा काढा आंतरराष्ट्रीय परवाना...
परदेशात जाण्यासाठी काढलेला व्हिसा, आधार कार्ड, पॅनकार्ड, मेडिकल सर्टिफिकेट आदी जोडून ऑनलाइन प्रक्रिया करून ‘आयडीपी’ (इंटरनॅशनल ड्रायव्हींग परमीट) काढता येते. यासाठी ऑनलाइन पैसेही भरता येऊ शकतात. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर ज्या ठिकाणाहून परवाना काढत आहोत त्या ठिकाणी ही सर्व कागदपत्रे दाखविणे गरजेचे आहे.
कोण काढतो परवाना...
पर्यटक, विद्यार्थी तसेच मोठे व्यापारी असा परदेशातला परवाना काढतात. हिंगोली जिल्ह्यत आतापर्यंत ४ जणांनी परवाना काढलेला आहे. या चारही जणांच्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थितरीत्या केली आहे. सद्य:स्थितीत ‘आयडीपी’ काढणे सुरू आहे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.
प्रतिक्रिया...
‘आयडीपी’ चा कालावधीत एक वर्ष किंवा व्हिसाचा व्हॅलेडीटी पासपोर्ट भारतीय नागरिकत्व दाखवते तर व्हिसा म्हणजे परदेशात राहण्याचा परवाना. आयडीपीची मुदत संपली तर लगेच भारतात येवून नूतनीकरण करून घ्या. ज्या ठिकाणावरून परवाना काढला आहे त्याच ठिकाणी नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे.
-अनंता जोशी, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी.
कोरोना काळात संख्या घटली
२०१८ मध्ये ००
२०१९ मध्ये ०१
२०२० मध्ये ००
२०२१ मध्ये ०३