कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक असल्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. नाशिक येथील ऑक्सिजन गळतीमुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन नलिका व कार्यप्रणाली तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्या अध्यक्षतेखाली सहा पथके स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा शासकीय व १२ खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करण्यात आली. यानंतर तपासणी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. या पथकात उपप्राचार्य डॉ. एफ. बी. तनूरकर, सद्दाम छोटू साहब फकीर, आर. पी. बहुरूपे, डॉ. नगरे, पिसे, नीळकंठे, डॉ. बेले, लोखंडे, कपाळे, मुकेश सामलेटी, जे. पी. हराळ, डॉ. मेने, रेकुलवार, युधीष्टिर शिवरकर, के. आर. सरकटे, डॉ. चिलकेकर, रामगीलवार, पोतरे, अजय केदार, व्ही. सी. रणवीर, डॉ. बर्गे, जैन, पेरसळे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
फोटो : १