औंढा नागनाथ : तालुक्यातील धार-माथा पूर्णा नदीवरून जाणाऱ्या औरंगाबाद-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोलीकडेऑक्सिजन घेऊन जात असलेला टँकर अचानक उलटला.यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लीक झाला. तब्बल दोन तासांच्या दुरुस्ती नंतर हे टँकर हिंगोली कडे रवाना करण्यात आले. सुदैवाने यात काही जीवित हानी झाली नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. सुरवातीला गॅस असल्याच्या अफवेने प्रवासी घाबरले होते.
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवरून औरंगाबाद नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा नदीवरील पूल अरुंद असल्याने औरंगाबाद येथून हिंगोलीसाठी ऑक्सिजन टँकर घेऊन येणाऱ्या चालकाला त्याचा अंदाज आला नाही. अचानक नियंत्रण सुटल्याने 16 टायर महाकाय टँकर रस्त्याच्या कडखाली जाऊन उलटला. झाला ही घटना सायंकाळी 5 वाजता घडली. चालक व इतर दोघांनी उड्या घेऊन जीव वाचविला. परंतु टँकरमधील ऑक्सिजन लीक झाला. प्रवाश्यांना गॅस असल्याची भीती वाटल्याने धावपळ झाली होती. परंतु वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांना हायसे वाटले. 2 तासाच्या प्रयत्नानंतर गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या साहयाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला. परत हिंगोली येथे रवाना करण्यात आले. या बाबत तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुढे, साहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, लांडगे, गणेश पवार याना पाचारण केलं होतं रस्त्याचा दोन्ही बाजूनी वाहनांच्या रंगा लागल्या होत्या 2 ते अडीच तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागला.