लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिंगोली-परभणी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सध्या परभणी जिल्ह्यातील इच्छुक जि.प. व न.प. सदस्यांच्या भेटी-गाठी घेताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मात्र शांत दिसत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे स्व.ब्रिजलाल खुराणा यांनी लढा दिला होता. मात्र त्यांना यश आले नाही. माजी मंत्री रजनीताई सातव यांनी परभणी जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी या मतदारसंघातून बाजी मारली होती. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याला कधी संधीच मिळाली नाही. या निवडणुकीत कायम परभणीचाच वरचष्मा राहिला आहे. परभणी जिल्ह्यात गटा-तटाचे मोठे राजकारण असल्याने त्याचा फायदा हिंगोलीत एकजूट दाखवून कधीही उचलता आला आहे. यावेळी त्या दिशेने काहीजण पावले टाकायची तयारी करीत होते. मात्र अजूनही कोणी मैदानात उतरायचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची इच्छा दिसत होती. मात्र ते पक्षश्रेष्ठींकडे डोळे लावून बसले आहेत. तर विद्यमान आ.बाबाजानी दुर्राणी यांनी हिंगोलीतील सर्वच तालुक्यांना जावून मतदारांच्या भेटी घेतल्या. आता भाजपचे सुरेश नागरे हे फिरताना दिसत आहेत. एकूण ५0३ मतदारसंख्या असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे एकत्रित संख्याबळ जास्त आहे. तर शिवसेना भाजपचेही दीडशेच्या जवळपास मतदार होतात. मात्र निवडणूक एकत्रितपणे लढणार का? हाही एक प्रश्नच आहे.
परभणीच्या इच्छुकांच्या हिंगोलीत घिरट्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:27 AM