जिल्ह्यात हिंगोली परिसर ९३, सेनगाव परिसर ८९, औंढा परिसर १२१, वसमत परिसर १०४ आणि कळमनुरी परिसरात १०५ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली. परंतु, एकही रुग्ण आढळून आला नाही. हिंगोली परिसरात १४७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला. औंढा परिसर ३५, वसमत परिसर ८८ आणि सेनगाव परिसरात ६३ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता एकही रुग्ण आढळून आला नाही. आयसोलेशन वॉर्ड येथील एक रुग्ण बरा झाल्याने त्यास घरी सोडून देण्यात आले.
आजपर्यंत कोरोनाचे १५ हजार ९६१ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ५६६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. आजघडीला नऊ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आजपर्यंत एकूण ३८६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत, सिद्धेश्वर, कौठा येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन चालू करण्यात आले आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.