लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आहेत.जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस समस्येचे माहेरघर बनत चालले आहे. रूग्णालयातील असुविधांचा पाढाही मोठा आहे. विशेष म्हणजे येथील पाणीप्रश्न मागील चार दिवसांपासून गंभीर बनला आहे. रूग्णालयास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच नादुरूस्त झाली आहे. तर पालिकेने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना दुरूस्ती करून घेण्याचे पत्र दिले. परंतु संबधित कर्मचाºयास पाईपलाईन दुरूस्तीच्या केव्हाही सूचना दिल्या जात आहेत. दुरूस्तीसाठी लागणाºया खर्चाबाबत कर्मचाºयास पैसे दिले जात नाहीत. परंतु या ताळमेळात मात्र शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया रूग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रूग्णांचे नातेवाईक पाण्याच्या शोधात रुग्णालय परिसरात भटकंती करीत आहेत. परिसरातील हॉटेलचालकही काही तरी खरेदी केल्याशिवाय पाणी देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.याबाबत शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले पाणी समस्या सोडविण्याचे प्रभारी सीएस डॉ. मंगेश टेहरे यांना सांगितले आहे. तर पाईपलाईन दुरूस्तीचे काम दोन दिवसांत पॅर्ण करुन घेणार असल्याचे डॉ. टेहरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य रुग्णालयात टोलवा-टोवलीचा खेळ सुरू आहे. त्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भेट देऊन कडक शब्दांत सुनावले तरीही सवयींचे गुलाम झालेल्या रुग्णालय प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. केवळ दिवस ढकलण्यासाठीच अनेकांनी या रुग्णालयाची सेवा पत्करली असून सर्वच लोकप्रतिनिधींची याला मूक नव्हे, तर उघड संमती असल्याने जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा झाला तरीही कुणाला सोयरसुतक नाही.
पिण्याच्या पाण्यावाचून रूग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:40 AM