हिंगोली : वजनमापे फेरतपासणीत कारवाईं |
हिंगोली : /वैधमापन /विभागाने व्यापार्यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ३ हजार ५५७ वजनमापांची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात या वजनमापांची तपासणी अचानकपणे करण्यात येते. तत्पूर्वी नोंदणीकृत व्यापार्यांना त्यांच्या मापांची तपासणी करून घ्यावी लागते. त्यासाठी या विभागाकडून स्वंतत्र कॅम्प आयोजित करण्यात येतो; परंतु बहूतांश व्यापारी त्याला प्रतिसाद देत नाहीत. अशा व्यापार्यांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. प्रामुख्याने त्यात १0३ व्यापार्यांच्या मोजमाप काट्यावर कारवाई झाली. त्यांच्याकडून ३१ हजार २00 रूपये दंडही वसूल करण्यात केली. कारवाईबरोबर दंड लावल्याने मापात 'पाप' करणार्या व्यापार्यांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे या विभागाकडून जसे माप तसे शुल्क याप्रमाणे दुरूस्तीसाठी आणलेल्या मोजमापाचे शुल्क आकारण्यात येते; परंतु ही प्रक्रिया बंद आहे. /(प्रतिनिधी) ■ जिल्ह्यात सेनगाव, औंढा नागनाथ, जवळाबाजार, सिरसम, कनेरगावनाका, नर्सी नामदेव, गोरेगाव आदी ठिकाणी वजनमापे तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला होता. त्यासाठी व्यापार्यांना नोटीसाही पाठविण्यात आल्या. तरीही व्यापार्यांनी वजनकाट्यांची तपासणी केली नसल्याची माहिती हिंगोली येथील वैधमापन निरीक्षक ब. दे. पायघन यांनी सांगितले. |
वैधमापन विभागाचा १0३ व्यापार्यांना दंड
By admin | Published: December 05, 2014 3:22 PM