लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उच्च न्यायाजयाने ठरवून दिलेल्या आदेशानुसार ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाºया विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाºयांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मागील आठवडाभरात विविध ठिकाणी कारवाई करून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाºयांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१३ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान डीजेच्या वापरासाठी बेकायदेशीर तयार केलेले वाशिम येथील वाहन क्रमांक एमएच-२८-एच६१७४ हे आढळून आले होते. सदर वाहन पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. सदर वाहनावर उपप्रादेशिक विभागाने कारवाई करून २३ हजार ७०० दंड आकारण्यात आल्याची माहिती ग्रामीण ठाण्याचे पोनि मारोती थोरात यांनी दिली.जिल्हाभरात विविध पोलीस ठाणे अंतर्गत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाºयांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. शिवाय याबाबत सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी संबधित ठाणे अधिकाºयांना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन करावे. तसेच ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाºयांची गय केली जाणार नाही, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले.
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:22 AM