यामध्ये ० ते ५ वयोगटातील ग्रामीण १ लाख ४ हजार ३७१, तर ग्रामीणच्या २९ हजार २११ बालकांना लस दिली जाणार आहे. यासाठी शहरी भागात एकूण १३३, तर ग्रामीण भागात ९४१ बुथची स्थापना करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागासाठी एकूण २४४०, तर शहरी भागासाठी ३७१ कर्मचारी लागणार आहेत. या दोन्हींवर नियंत्रणासाठी २२१ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
या मूळ लसीकरणातून सुटलेलेही लसीपासून वंचित राहू नये यासाठी गृहभेटींचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यात ग्रामीणच्या २ लाख २ हजार ५०६, तर शहरी ४७ हजार २१४ घरांना भेटी दिल्या जातील. यासाठी ग्रामीणला ५२०, तर शहरी भागासाठी १०७ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तीन दिवस ते भेटी देतील, तर ट्रांझीट, मोबाइल व नाइट टीम राहणार असून, कारखाने, नवीन बांधकामे येथे भेटतील.