कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूचे महत्त्व लक्षात घेता सहायक आयुक्त समाजकल्याणच्या वतीने परिसरात तीन हजार रोपटे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ८ जून रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा, समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, प्राचार्य गणेश शिंदे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या हस्ते आंबा, चिकू, पिंपळ, वड, जांभूळ, चिंच, पेरूची २०० रोपटे लावण्यात आली.
यावेळी इंजि. इडॊळे, वरिष्ठ निरीक्षक रविकिरण पौराणिक, आत्माराम वागतकर, व्ही. जी. कदम, बोरा, बाळासाहेब पवार, मईंग, सखाराम चव्हाण, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, शेषराव जाधव, संतोष वाघमारे, नितीन खरात, सुनील वडकुते, ससाणे, अनंत बिजले, बाळू पवार, प्रकाश वजीर, टेम्भूर्णे, नितीन राठोड, गंभीर, संदीप घंतोडे, दीपक कांबळे, सुरेश भागवत, संतोष होडबे, नरेश पौळकर, अरविंद वाढवे, हर्षद पुंडगे, सुनील कांबळे, पडघान आदींची उपस्थिती होती.
फोटो : २५