शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:38 AM

पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली. घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली.घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी हे गाव पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावात अग्रणी आहे. गावात भरपूर कामे झाली. अखेरच्या टप्प्यात गावातील गायरानात शेततळे खोदण्याचे काम मशिनद्वारे सुरू आहे; परंतु तळ्याचे काम सुरू असलेली जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा करीत बऊरच्या काही मंडळींनी हे काम रोखले. काम अडविल्याने भुरक्याच्या वाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज देत प्रश्न सोडविण्याची विनंती केली. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, एमआरईजीएसच्या वर्षा स्वामी यांनी १७ मे रोजी स्थळ पाहणी केली. त्यानंतर भुरक्याच्या वाडीचा गट क्र. ७५ गायरान असून सध्या सुरू असलेले काम गायरानातच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. बऊरच्या गट क्र. ३६ धारकास काही अडचण असल्यास त्यांनी त्यांचे शेत मोजून घ्यावे, असे लेखी कळविले. त्यानंतरही सदर काम अडविण्यात आले. त्यामुळे २० मे रोजी दुपारी १ वाजता भुरक्याच्या वाडीतील १५० ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले व दाद मागितली.बऊरच्या संबंधितांविरूद्ध ठाण्यात लेखी तक्रारही दिली. पोनि व्ही.एम. केंद्रे यांनी घटनास्थळी जावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मोजणी करून ‘शिव’ निश्चिती करा, असा आग्रह धरल्याने अखेरच्या टप्प्यात पाणी फाऊंडेशनच्या कामाला खीळ बसली. तालुक्यात सुरू असलेल्या कामात ‘शिवे’च्या वादावरून काम बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे.भुरक्याच्या वाडीचेच ते गायरान असल्याने लेखी तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतरही तुम्ही जमीन मोजून घ्या व हद्द निश्चित झाल्यानंतरच काम करा, असा हट्ट धरल्याने आम्ही २०० ते २५० ग्रामस्थ तहसीलदारांकडे जावून तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करून द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सरपंच संतोष भुरके यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा