शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

औंढ्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 1:28 PM

Crime News in Hingoli पोलिसांनी वाळकी फाटा येथे केली कारवाई.

औंढा नागनाथ:   अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी मंगळवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान वाळकी फाट्यावर कारवाई केली. यावेळी वाहन आणि देशी दारूचे १५ बॉक्स असा ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली आहे.

कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात ब्रेक-दि -चेन अंतर्गत शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. यानुसार  देशी-विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अवैध वाहतूक करून खेडोपाडी दारू पोहचत आहे. या माहितीवरून मंगळवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या पथकाने हिंगोली औंढा राज्य रस्त्यावरील वाळकी फाटा येथे सापळा लावला. यावेळी पहाटे २ वाजेच्या दरम्यान एका वाहनास पोलिसांनी अडवून तपासणी केली. त्यात देशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी वाहनासह देशी दारूचे १५ बॉक्स असा ५ लाख ३७  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजू संभाजी गीते ( २५ ), राजरत्न मनोहर पाईकराव ( २५ ), बबन दराडे ( २५ ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार अफसर पठाण, बंडू घुगे, इक्बाल शेख, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, बांगर,वसीम पठाण आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.  

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी