लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.मागील तीन दिवसांपासून ते हिंगोली जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आलेले आहेत. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधीक्षक अरविंद चावरिया उपस्थित होते. यावेळी प्रसाद म्हणाले, जिल्ह्याची एकंदर कामगिरी पाहता समाधानकारक आहे. एम.पासपोर्ट या प्रकारात जिल्ह्याने राज्यात उल्लेखनिय काम केले आहे. जलद गतीने चारित्र्य प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय आता सायबर क्राईमसाठी नवे अधिकारी रुजू झाले आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये त्यांची मदत होणार आहे.ते म्हणाले, जिल्ह्यात पोलीस काका व दिदी हा उपक्रम राबविला जाणार आहे. पोलिस हा जनतेला आपला मित्र वाटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे ते माहिती देण्यास घाबरणार नाहीत व गुन्हेगारीवरही नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. तर उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी पोलीस कोठडीत मयत पावलेल्या आरोपीच्या मुलीला दत्तक घेतल्याचे कौतुक करून हा धाडसी व चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुन्ह्यांचा आलेखही मांडला. यात १३ जणांना तडिपार केल्याचे सांगून दिवसा घरफोडीच्या १२ पैकी ५ प्रकरणांत तपास लागल्याचे सांगितले. गतवर्षी १२ पैकी २ चा तपास लागला होता. तर रात्री घरफोडीच्या ७१ पैकी १८ घटनांचा तपास लागला. गतवर्षी ६८ घटना घडल्या होत्या. अॅट्रॉसिटीची प्रकरणे गतवर्षी ५0 यंदा ६७ झाली. विनयभंगाची गतवर्षी ५७ होती. यंदा ८१ झाल्याचे ते म्हणाले. तर आता पोलीस दलातील अधिकाºयांची रिक्त पदे भरली जात आहेत. कर्मचाºयांच्याही जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे काम, ठाणे परिसर व एकंदर कार्यपद्धती सर्वांत चांगली वाटल्याचेही प्रसाद यांनी सांगून पोनि जगदीश भंडारवार यांचे कौतुक केले.
हिंगोली जिल्ह्यात पोलीस वसाहतीचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:53 PM
जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.
ठळक मुद्देचिरंजीव प्रसाद : अडीचशे घरांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात