लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. नवोदय विद्यालयात शिक्षकांनीच विद्यार्थिनींशी व बँक व्यवस्थापकाने महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात हे प्रकर्षाने समोर आले आहे.वसमतच्या नवोदय विद्यालयातील दोन मुलींशी तेथीलच दोघा शिक्षकांनी गैरवर्तन केले. सदर घटना ६ मार्च रोजी घडली. प्रकरणाची तक्रार घेवून प्राचार्य वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले. शाळकरी मुलीशी शाळेच्या आवारातच गैरवर्तन करणारे चक्क शिक्षकच असल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याने प्राचार्यालाच उलट पावली परत पाठवले. ज्या मुलींची छेड काढल्या गेली त्यांनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार देण्याचा हट्ट धरला. अल्पवयीन शाळकरी मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगात पोलिसांनी खरे तर पालकांच्या भूमिकेत तातडीने शिक्षकांना धाक वाटेल, असे पाऊले उचलणे अपेक्षित होते. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याला या प्रकरणाचे गांभीर्र्यच समजले नाही. विशेष बाब अशी की, याच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी त्या दोन्ही शिक्षकांना ठाण्यात पाचारण केले. ‘सांगोपांग’ चर्चा केली, गुप्त चर्चेने पोलिसांचे काय ‘समाधान’ झाले त्यांना सन्मानाने परत पाठवले. त्यामुळे ते दोघे शिक्षक पुन्हा गावात आल्याचे पहावयास मिळाले.आता सदर प्रकरण ‘लोकमत’ ने उजेडात आणल्यानंतर ग्रामीण पोलीस स्वत:ची बाजू सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. शनिवारी प्राचार्याशी पोलिसांनी चर्चा केली व आम्ही जर कारवाई केली तर परीक्षांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे येण्यासाठी घाबरत आहेत. तर पोलीस मुलीच्या पालकांना धीर व हिंमत देण्याऐवजी तक्रार पीडित मुलीकडून देण्यात आली पाहिजे, असा हट्ट धरत आहेत.वसमत येथील युनियन बँंकेत शाखाधिकाºयाने केलेल्या असभ्य वर्तनाविषयी महिलेने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली. अनेकींपैकी ही एक महिला होती. मात्र तिची तक्रार घेण्याअगोदर दोन दिवस वाटाघाटी व चर्चा झाल्याचेही आता समोर येत आहे. ज्याच्या विराधात तक्रार आहे, तो व्यवस्थापक गुन्हा नोंदवण्याच्या एक दिवस अगोदर पोलीस अधिकाºयांसोबत चर्चा करून आल्याचेही समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी पोलीस अटक करतील, अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांना तो शाखाधिकारी म्हणे सापडलाच नाही. जर महिलेशी गैरवर्तनच्या प्रकरणातील बँकेचा अधिकारी जर पोलिसांचे पथक शोधू शकत नाहीत तर अट्टल गुन्हेगाराचा शोध कसा घेत असतील? हा प्रश्नच आहे.
महिलांच्या तक्रारींबाबत पोलीस संवेदनशून्य का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:02 AM