१९ गुन्ह्यातील १४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ठाण्याच्या परिसरातील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळापूर पोलिसांच्या वतीने अवैध दारू विक्रीवर बंदी आणण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी करून गुन्हे दाखल केले होते. बोल्डा फाटा, वारंगा फाटा, दांडेगाव, रामेश्वर तांडा, आखाडा बाळापूर, येहळेगाव, कामठा फाटा या भागात बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री करताना पकडले होते. त्या ठिकाणाहून देशी दारूचा व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला होता. ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने बाळापूर ठाण्याची रंगरंगोटी व टापटीपपणा करणे काम सुरू असल्याने हा दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार पातळे, जमादार कराळे, गौतम यांनी हा मुद्देमाल ठाणे परिसरात मोकळ्या जागेत नष्ट केला.
जप्त केलेला अवैध दारूचा मुद्देमाल पोलिसांनी केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:37 AM