रिॲलिटी चेक लोगो वापरावा..
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे अगोदर पोलिसांची गाडी हिंगोली शहरातून सूचना देत फिरत असली तरी रात्री १० वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलीस थांबत नसल्याचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले.
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५ झाली आहे. सध्या १७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २४ फेब्रुवारीपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजेनंतरही काही वेळ नागरिक रस्त्यावर फिरत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेदरम्यान पोलिसांची गाडी शहरातून गस्त घालत होती. मात्र त्यानंतर पोलिसांची गाडीही गायब झाली होती अन् चौकातील पोलीस ही. गुरूवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान शहरातील तलाब कट्टा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका चौक, जुनी जि. प. इमारत चौक, अकोला बायपास, आखरे मेडिकल चौक, जवाहर रोड भागात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. काही भागात दुचाकी मात्र धावत असताना दिसून येत होत्या. तर एका चौकात नागरिक उभे होते.
नांदेड नाका चौक
शहरातील नांदेड नाका चौक परिसराच्या बाजूला तीन ते चार नागरिक बोलत उभे होते. चौकातून जाणारी वाहने वगळता शुकशुकाट जाणवत होता.
इंदिरा गांधी चौक
हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात एकही पोलीस नव्हता. तर अधून-मधून दुचाकी वाहने धावत होती.
भगवान महावीर चौक
हिंगोली शहरातील भगवान महावीर चौक परिसरात पाहणी केली असता यावेळी एकही पोलीस आढळून आला नाही. चौक निर्मनुष्य दिसत होता.
महात्मा गांधी चौक
हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातही एकाही पोलीस कर्मचारी नियुक्त नव्हता. यावेळी एका रस्त्यावर काही नागरिक गप्पा मारताना दिसत होते.
दोन जणांवर गुन्हे दाखल
१) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
२) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत हिंगोली शहरातील एका मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.
३) शहरातील बहुतांश नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असले तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
प्रतिक्रिया