शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पोलिसांची दडपशाही चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:05 AM

जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. उद्या यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असा इशारा शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून दिला. आ.रामराव वडकुते यांनी आक्रमक भूमिका मांडली.मराठा आरक्षणातील आंदोलकांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. एक-दोन प्रकार वगळता इतरत्र नाहक गुन्हे दाखल केले. शिवाय आरोपींची संख्या मनमानी पद्धतीने वाढविल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. आंदोलन दडपण्यासाठी जर हे करणार असेल तर यामुळे उद्रेकच होईल. उद्या यामुळे नवे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा ही नावे आता वगळा, अशी मागणी करण्यात आली. तर काही अधिकारी वैयक्तिक प्रकरण असल्यासारखे वागत आहेत. अशांना समज देण्याची मागणी केली. तर आंदोलनाचे संयोजक म्हणूनही काही जणांची नावे नाहक टाकली. तीही वगळण्याची मागणी केली. तर आंदोलन दडपण्यासाठी शासनानेच आदेश तर दिला नाही? असा सवालही केला. तर नावे नसलेल्यांच्या घरी जावूनही नाहक चौकशा केल्या जात आहेत, हे चुकीचे प्रकार थांबविण्याची मागणी केली. यावेळी आ.वडकुते हे आक्रमक झाले होते.आखाडा बाळापूर येथील सपोनि चिंचोलकर यांच्या अशिष्ट वागण्याबाबतही अनेकांनी तक्रारी मांडल्या. या शिष्टमंडळात आ.रामराव वडकुते, आ.संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राकाँ जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अ‍ॅड. बाबा नाईक, माधव कोरडे, बी.डी. बांगर, धनु पाटील, राजेगोरे, कैलास साळुंके, रवींद्र गडदे, राम कदम, बालाजी घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासूनच योग्य ती कारवाई करू. यात कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, हे स्पष्ट केले. यावेळी स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा