हिंगोली शहर पोलिसांनी मोक्काची कारवाई केल्यानंतर नाना उर्फ नृसिंह नायक हे अनेक दिवस हाती लागत नव्हते. शेवटी त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मात्र त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुधीर ढेंबरे यांनी त्यांचे फोनवरून दुसऱ्याशी संभाषण करून दिले. यातही पुन्हा संभाषण दरम्यान धमकी देण्याचा प्रकार घडला. याबाबत तपासिक अंमलदारांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. यावरून ढेंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून कलासागर यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस दलाला शिस्तीचे धडे देऊन कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या बेताल वागण्यांवर आता निर्बंध आले आहेत.
हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील या प्रकारासह व्हायरल क्लिपचे आणखी एक प्रकरण चर्चेत आहे. यातही कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.