जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण वाढत चालल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. मार्च महिन्यापासून काही दिवस वगळता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रूग्ण संख्या वाढत् असताना नागरिकही बेजबाबदारपणे वागत असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आवर घालताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शासन, प्रशासनाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागत आहे. गस्त घालण्यासह, विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करून घेणे, रूग्णांना दवाखान्यात पोहचविण्यासाठी मदत करणे, बंदोबस्त ठेवणे, संचारबंदी नियमांचे पालन व्हावे, यासाठी जनजागृती करणे आदी कामे करावी लागत आहेत. त्यामुळे २४ तास दक्ष रहावे लागत आहे. कामाच्या व्यापात मात्र स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातूनच काही पोलिसांना कोरोनाचा संसर्गही झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांच्या चिंतेतही भर पडत आहे.
लसीकरण
जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी - १०८९
पोलीस अधिकारी - ७८
लसीकरणाचा पहिला डोस घेणारे
कर्मचारी - ८०७
अधिकारी - ६७
लसीकरणाचा दुसरा डोस घेणारे
कर्मचारी -५१४
अधिकारी -४५
एकही डोस न घेणारे
कर्मचारी -२८२
अधिकारी -११
८८ पोलीस पॉझिटिव्ह
एकूण कोरोना बाधित पोलीस -७५
सध्या उपचार सुरू असलेले - ०३
एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी -१०
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी -००
मृत्यू - ०१
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय... !
कोरोनामुळे पप्पा रात्री उशिरापर्यंत ड्यूटीवर थांबतात. त्यामुळे कोरोना कोण्याची भीती वाटत आहे. विनाकारण फिरणारे नागरिक घरी थांबल्यास पप्पासह इतर पोलिसांवरील ताण कमी होईल.
-अमोल बळीराम बंदखडके,
कोरोना काळात नागरिकांना शिस्त लावावी लागत आहे. त्यामुळे पप्पांचेही काम वाढले आहे. पप्पांनाही आजार होऊ नये, यासाठी सकाळीच त्यांना आरोग्याची काळजी घेण्याची आठवण करून देत आहे.
- भावी अशोक धामणे
कोरोना संसर्ग वाढत असतानाही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्याचे काम पप्पांना करावे लागत आहे. नागरिकांनी स्वत: शिस्त पाळावी. पोलिसांनाही कुटूंब असते. पप्पा घरी येईपर्यंत काळजी असते.
-अवनी अकाश पंडितकर
कोरोनामुळे रात्री उशिरापर्यंत पप्पा घराबाहेर थांबत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी वाटत असते. ते आजारी पडू नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतो.
- पार्थ रविकांत हारकळ