७१ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच औंढा नागनाथ तहसीलमध्ये ११ जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गोपनीय टपाल मतपत्रिका पॉकेट तयार करण्याचे काम झाले. जे कर्मचारी, अधिकारी निवडणूक कर्तव्यावर आहेत व ज्यांनी विहित नमुन्यात टपाली मतपत्रिकेची मागणी केली आहे, अशा सर्व पात्र अर्जदारांना टपाली मतदान तयार करून गोपनीय पॉकेटमध्ये सदर मतपत्रिका पाठविण्याचे काम तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, गटविकास अधिकारी जगदीश शाहू हे करीत आहेत.
तहसीलमध्ये सोमवारी मतदान केंद्र अध्यक्षाची तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, निवडणूक मास्टर ट्रेनर गंगाधर साखरे यांनी मतदान केंद्राध्यक्ष यांना मार्गदर्शन केले.तसेच मतदान कक्षामध्ये मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरते वेळी घ्यायची काळजी यावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो ७