शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:45 AM

महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.हिंगोली जिल्ह्यात विविध भागात अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. डीपीवरून वीजचोरी होत असल्याने भाव वाढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा डीपीवर नियमित जोडणी घेवून देयके भरणाऱ्या शेतकरी व घरगुती ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील वीजचोरीला आळा घालण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता एस.बी. जाधव यांनी केले. तर संबंधित ऐकतच नसल्यास याची माहिती महावितरणलाही द्यावी, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात फिडरनिहाय थकबाकी व वीजचोरीच्या प्रकाराची माहिती गोळा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीजचोरीविरुद्ध यापूर्वीही मोहीम राबविण्यात आली होती. यंदा पुन्हा अशी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारांना अटकाव करणे गरजेचे आहे. शिवाय महावितरणच्या अधिकाºयांनाही कृषी व घरगुती अनधिकृत वीजजोडण्या असल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील, असेही जाधव म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातील थकबाकीचा आकडाही वाढत चालला आहे. घरगुती असो वा कृषीपंप. ही थकबाकी भरल्याशिवाय यापुढे रोहीत्र देणे शक्य नाही. महावितरणच्या वरिष्ठांचेच तसे आदेश आहेत. त्यामुळे शेतकºयांना वेठीस धरण्यासाठी नव्हे, तर महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी हे अपरिहार्य आहे. शेतकºयांनी अधिकृतरीत्या देयके भरल्यास अशांची अडवणूक करण्याचे कोणतेच कारण नाही. देयक भरल्यानंतर संबंधित शेतकºयांना रोहीत्र वेळेत बदलून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.कृषीपंपधारक शेतकरी पूर्ण देयक वेळेवर भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. वर्षाचे देयक मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यातही प्रति हॉर्सपॉवर हजार रुपये याप्रमाणे देयकाची रक्कम भरल्यास नादुरुस्त डीपी दुरुस्त करून दिला जाईल. ही रक्कम पूर्ण देयकाच्या तीस टक्क्यांच्या आसपासच होते.त्यामुळे एक एचपीच्या पंपास हजार रुपये, तीन एचपीसाठी तीन हजार रुपये, पाच एचपीसाठी पाच हजार रुपये भरावे लागतील. त्या रोहित्रावरील प्रत्येक शेतकºयाने एवढी रक्कम भरल्यास रोहित्र वितरित करण्यात येणार असल्याचेही जाधव म्हणाले.गावठाण रोहित्रावर मात्र किमान ७५ टक्के थकबाकी वसूल झाल्याशिवाय रोहीत्र वितरित केले जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण