‘शिरडशहापूर येथे धूरफवारणी करावी’
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील अनेक वॉर्डातील नाल्या साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डासांमुळे इतर आजार उद्भवू शकतो, असे नागरिकांना वाटत आहे. ग्रामपंचायतने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन गावात धूरफवारणी करणे गरजेचे आहे.
शेतकरी शेती मशागतीत व्यस्त
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, कांडली आदी भागातील शेतकरी सध्या शेतकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सकाळच्या वेळेला मशागतीची कामे उरकून घेतली जात आहेत.
ऊन असह्य होऊ लागले
आखाडा बाळापूर : मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. वाढते ऊन लहान मुले, वृद्धांना असह्य होत आहे. एप्रिल महिन्यात ही स्थिती तर येणाऱ्या मे महिन्यात काय हाल होतील हे सांगणे कठीणच आहे.